Vinod Dengale
ई-सकाळमध्ये मल्टीमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत असून अर्थव्यवस्था, शेअर बाजार, बिझनेस, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि पर्सनल फायनान्स या विषयांवरील बातम्या आणि विश्लेषण साध्या, समजण्यास सोप्या भाषेत मांडणे ही माझी खासियत आहे.
पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदवी पूर्ण केली. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटमधून मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझममध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. या प्रवासात राजकारण, भू-राजकारण, जागतिक घडामोडी, अर्थशास्त्र, क्रीडा आणि माध्यम अभ्यास यांचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळाली.
पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना मल्टिमीडिया आशय निर्मितीत विशेषतः ऑडिओ व्हिज्युअल कंटेट, डिजिटल स्टोरीटेलिंग, स्क्रिप्ट रायटिंग आणि वेब पत्रकारिता यात प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाला, ज्यामुळे पत्रकारितेकडे पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन विकसित झाला.
ई-सकाळमध्ये फायनान्स आणि बिझनेस बीट हाताळताना पर्सनल फायनान्स, अर्थव्यवस्था, बिझनेस ट्रेंड्स आणि शेअर बाजारातील महत्त्वाच्या घडामोडी अचूक, विश्वसनीय आणि सोप्या मराठी भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर माझा भर आहे.