

Attack on Mumbai-bound ST bus; Atmosphere of fear created among women and passengers
Sakal
चाकण : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात भाईगिरी आणि गुंडगिरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ एसटी बसचा हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका माथेफिरूने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव एसटी बसची रस्त्यातच तोडफोड केली. चाकण एसटी स्थानकाजवळ घडलेल्या या थरारक प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, एसटी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.