chandrakant patil and rajesh pandey
sakal
पुणे - विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रनधुमाळी सुरू झालेली असताना महायुतीपुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यातच भाजपने या निवडणुकीसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवडणुकीच्या प्रभारीपदाची धुरा सोपविली आहे. तर प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.