Pune Crime : वाघोलीत कोयत्याने केलेल्या हल्ल्यात महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
college youth dies after being attacked by koyta in Wagholi crime police
college youth dies after being attacked by koyta in Wagholi crime policeesakal
Updated on

Pune News : एका महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना वाघोली येथील बकोरी रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश साधू डोके (वय २१, रा. वाडेबोल्हाई) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने महेशवर कोयत्याने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या महेशला खासगी रुग्णालयात दाखल केले.

त्यानंतर ससून रुग्णालयात नेत असताना त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. महेश वाघोली येथील बी.जी.एस. महाविद्यालयात बी.बी.ए.च्या शेवटच्या वर्षात शिकत होता. महेशला रूग्णालयात घेऊन जाताना त्याने साक्षीदारास हल्लेखोराचे नाव सांगितले. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

महेश वाडेबोल्हाई येथील एका वसतिगृहात राहत होता. त्याच्या नातेवाइकांची माहिती अद्याप मिळालेली नाही. महेशने आरोपीचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. महेशने साक्षीदारास दिलेल्या तोकड्या वर्णनावरून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. आरोपीच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली आहेत. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे वरिष्ठ निरीक्षक काईंगडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com