कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा
कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा
Published on: 

‘दुष्‍काळी’ समावेशासाठी काँग्रेसचा मोर्चा

कऱ्हाडचा चार दिवसांत निर्णय न झाल्यास उपोषण; शासनाचा निषेध

कऱ्हाड, ता. ६ ः तालुक्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड तालुका त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन पीक विम्याची रक्कम जमा करावी, या मुख्य मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे येथील तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. चार दिवसांत मागणी मान्य न झाल्यास शेतकरी व काँग्रेसतर्फे उपोषण करण्याचा प्रशासनाला इशारा दिला.
आंदोलनापूर्वी दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कऱ्हाड उत्तरचे तालुकाध्यक्ष बाबूराव पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तहसीलदार कल्पना ढवळे यांना मागण्यांचे निवेदन देऊन शासनाच्या धोरणाचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पवार म्हणाले, ‘‘पाल, मसूर, शामगाव परिसरात गेल्या दीड- दोन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची दुरवस्था झाली आहे. सोयाबीन, हायब्रीड, ज्वारी, भुईमूग या पिकांचे नुकसान झाले आहे. पीक काढणेही परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांवर नांगर फिरवला आहे. बंधारे व जलसाठे पूर्णत: कोरडे पडले आहेत. महाबळेश्वरसारखा तालुका दुष्काळग्रस्त होतो, मग कऱ्हाड बाबतीत कार्यालयात बसून निर्णय का घेतला जात आहे.’’ या वेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित पाटील-चिखलीकर यांनी शासन व स्थानिक लोकप्रतिनिधींवर आरोप केला. ते म्हणाले, ‘‘पाटण, जावळी, महाबळेश्वर तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले असताना कऱ्हाडकडे दुर्लक्ष केले जात आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन पूर्व व पश्चिम भागातील गावांचा विचार करण्याची मागणी केली आहे. अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून नव्हे, तर प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करावी.’’

W55515
कऱ्हाड ः दुष्काळी तालुक्यात समावेश करावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी दत्त चौकात निषेध करताना काँग्रेसचे पदाधिकारी.

--------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com