

कोथरुड - दिव्यांग असलेल्या निलेश जागडे याने कर्ज काढून रिक्षा घेतली. त्यातून त्याचा उदरनिर्वाह सुरु झाला. सर्व काही सुरळीत चालले असताना अचानक आठ सप्टेंबर रोजी एका अज्ञात वाहनाने ठोकर देवून रिक्षाला मोठे नुकसान पोहचवले. आधीच कोरोनाने दिड वर्षे अडचणीत आलेल्या जागडे कुटूंबीयांच्या तोंडचा घासच पळवून नेल्यासारखे झाले. ही घटना ईनेब्लर चॅरीटेबल ट्रस्टच्या सभासदांना कळाली. त्यांनी मदतीचे आवाहन केले आणि दत्त धावून आला. आळंदी येथे सर्व्हीस सेंटर चालवणा-या दत्तात्रय लष्करे या युवकाने डेटिंग पेटिंगचा सुमारे पंधरा हजार रुपयापर्यंतच्या खर्चाचे काम मोफत करुन दिले.
त्यामुळे जागडे कुटूंबाला पुन्हा त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन परत मिळाले. मानवतेचे हे गहीरे नाते दैवत्वाची प्रचिती देते. जगण्याच्या लढाईला बळ देते अशी भावना जागडे कुटूंबियांनी व्यक्त केली. शरीराच्या अपंगत्वावर मनाच्या सृदृढतेने मात करता येते. फक्त आवश्यकता असते ती समजून घेण्याची आणि साथ देण्याची. ती गरज स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींमुळे पूर्ण होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.