Dhayani News : अतिक्रमण निरीक्षकाला लाथ मारून मारहाण; कामात अडथळा, जप्त केलेला माल परत देण्यावरून वाद

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त केलेला माल परत देण्याच्या मागणीवरून अतिक्रमण निरीक्षकाला शिवीगाळ करून लाथ मारल्याचा प्रकार घडला.
crime

crime

sakal

Updated on: 

धायरी - महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त केलेला माल परत देण्याच्या मागणीवरून अतिक्रमण निरीक्षकाला शिवीगाळ करून लाथ मारल्याचा प्रकार सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या पार्किंगमध्ये घडला. याप्रकरणी नितीन हणमघर (वय ३५, रा. जनता वसाहत) याच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (ता. ७) रात्री साडेआठच्या सुमारास घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com