Valhe Accident : चिमुकल्यांसमोरच वडिलांवर काळाचा घाला! वाल्हे येथे दुचाकी व चारचाकीचा अपघात; महिला गंभीर जखमी

पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर वाल्हे (ता. पुरंदर) हद्दीतील पातरमळा येथील हॉटेल समर्थ कृपाजवळ सोमवारी (ता. २३) दुचाकी व चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला.
four wheeler and two wheeler accident

four wheeler and two wheeler accident

sakal

Updated on: 

वाल्हे - पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर वाल्हे (ता. पुरंदर) हद्दीतील पातरमळा येथील हॉटेल समर्थ कृपाजवळ सोमवारी (ता. २३) सकाळी अकराच्या सुमारास दुचाकी व चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार दादासाहेब धोंडिबा सरगर (वय ४२, रा. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. सरगर यांच्या दोन ते तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींसमोरच त्यांचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...