

FDA Intensifies Action Against Illegal Tobacco Trade; Gutkha Stock Seized in Kunjirwadi
esakal
लोणी काळभोर : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथे गुरुवारी (२ जुलै) रोजी दुपारी धडक कारवाई करत एचपी पेट्रोल पंपासमोरील 'श्री दत्त टी स्टॉल' मधून तब्बल ६६ हजार ४८५ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. कारवाईनंतर दुकानासह लगतचे गोदाम सीलबंद करण्यात आले असून विक्रेता आणि पुरवठादाराविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.