

Sinhgad Education Society Faces Criminal Case Over Alleged Salary Embezzlement
esakal
पुणे: सिंहगड एज्युकेशन सोसायटीतील २७ शिक्षकांचे तब्बल पाच कोटी सहा लाख रुपयांचे वेतन थकवून त्याचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेचे संस्थापक मारुती नवले यांच्यासह सहा जणांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साडेपाच वर्षांपासून वेतन न मिळाल्याने शिक्षकांनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली.