ghod dam water storage
sakal
मांडवगण फराटा - शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्याची तहान भागवणाऱ्या चिंचणी येथील घोड धरणात सध्या १.३३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, एप्रिलअखेर किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. घोड शाखेचे अभियंता वैभव काळे यांनी ही माहिती दिली.