Cockroach in pune university girls hostel dining hall food
sakal
पुणे - जेवणात जिवंत झुरळांचा प्रादुर्भाव, अस्वच्छ वातावरणात अन्न निर्मिती, स्वच्छतेचा अभाव; केवळ एवढंच नव्हे तर संबंधित केटरर्सकडे अन्न सुरक्षेशी संबंधित आवश्यक नोंदी आणि कागदपत्रे तपासणीसाठी उपलब्ध नसल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील भोजनगृहावर धडक कारवाई केली आहे. या अन्न आस्थापनाच्या परवान्याचे अन्न व औषध प्रशासनाने निलंबन केले आहे.