

Junnar News 10000 Rupees for Teacher Voters and 3000 for Graduate Voters Reportedly Discussed During Pune Constituency Polls
esakal
नारायणगाव : पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी जुन्नर तालुक्यात मतदारांना लक्ष्मी दर्शनाचा लाभ झाला. शिक्षक मतदारसंघासाठीच्या मतदारांना एका मतासाठी दहा हजार रुपयांचे तर पदवीधर मतदारसंघासाठीच्या मतदारांना तीन हजार रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याची मतदारांमध्ये चर्चा होती. शिक्षक मतदारांचा दर जास्त होता. काही शिक्षकांना प्रत्येकी दहा हजार रुपये मिळाल्याने शिक्षक मतदारांची दिवाळी मात्र गोड झाली आहे.