

Leopard Attacks Mother in Law and Daughter in Law During Paddy Harvesting in Junnar One Woman Killed Another Injured
esakal
नारायणगाव: जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील भोईरवाडी येथे भात कापणी करत असलेल्या सासू व सुनेवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने सासू भिमाबाई जिजाभाऊ भोईर (वय 55) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.तर सून अश्विनी सुरेश भोईर (वय 35) या गंभीर जखमी झाल्या आहेत.