पुणे पोलिसांकडून किरण गोसावीच्या महिला असिस्टंटला अटक

पुणे पोलिसांकडून किरण गोसावीच्या महिला असिस्टंटला अटक
Summary

कार्डेलिया ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यानंतर किरण गोसावी हा सेल्फीमुळे चर्चेत आला होता.

कार्डेलिया ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यानंतर किरण गोसावी हा सेल्फीमुळे चर्चेत आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात एका गुन्ह्याप्रकरणी लूक आउट नोटिस जारी केली होती. आता याच प्रकरणी पुणे पोलिसांनी किरण गोसावीच्या महिला असिस्टंटला अटक केली आहे. शेरबानो कुरेशी असं या महिला असिस्टंटचं नाव आहे.

पुण्यात २०१८ मध्ये केलेल्या फसवणूक प्रकरणी किरण गोसावी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली होती. मलेशियात नोकरी लावतो म्हणून किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांनी तीन लाख रुपये तरुणाकडून उकळले होते.

याप्रकरणी किरण गोसावी आणि शेरबाने कुरेशी यांच्याविरोधात २०१८ मध्ये पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. या फसवणूक प्रकरणी पुणे पोलिसांनी शेरबाने कुरेशीला मुंबईतून अटक केली आहे. तर किरण गोसावीचा शोध घेण्यासाठी दोन पथके पाठवण्यात आली आहेत.

पुणे पोलिसांकडून किरण गोसावीच्या महिला असिस्टंटला अटक
गरज मुलांच्या मानसिकतेवर काम करण्याची

किरण गोसावी हा आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याच्यासोबतच्या सेल्फीमुळे चर्चेत आला होता. तेव्हा तो एनसीबीचा अधिकारी असल्याचा दावा सोशल मीडियावर केला गेला. नंतर एनसीबीने तो अधिकारी नसून साक्षीदार असल्याचं सांगण्यात आलं. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीच्या तपासवर प्रश्न उपस्थित केला होता.

दरम्यान, किरण गोसावीचा महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये शोध घेतला जात आहे. त्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहे. तर अटक करण्यात आलेल्या महिला असिस्टंट कुरेशीला न्यायालयात आज हजर करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com