

संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे (वय ८९) यांचे सोमवारी (ता. २०) रात्री साडेदहा वाजता चिंचवड येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. आळंदी येथे मंगळवारी (ता. २१) दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
साखरे महाराज यांची प्रकृती बिघडल्याने दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्यांना सोमवारी ह्रदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. साखरे महाराज यांच्या पश्चात मुलगी यमुना कंकाळ, मुलगा यशोधन साखरे, चिदम्बरेश्वर साखरे आहेत.