

Kondhwa Haveli Number 12 Sub Registrar Office Struggles During Power Cuts as Battery Backup Connection Still Remains Pending
esakal
कोंढवा : कोंढवा येथील खडी मशीन चौकातील दुय्यम निबंधक हवेली क्रमांक १२च्या नोंदणी कार्यालयात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक आणि दस्तनोंदणी करण्यासाठी येणाऱ्या पक्षकार आणि वकिलांना त्रास सहन करावा लागत आहे. अशावेळी बॅटरी बॅकअपचे साहित्य उपलब्ध असताना केवळ जोडणी करण्यात आलेली नसल्याने अधिक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सातत्याने विजपुरवठा खंडित होण्याच्या पार्श्वभूमीवर बॅटरी बॅकअपची जोडणी का करण्यात येत नाही? तसेच, ते धूळखात पडून का आहे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून कार्यालयातील असुविधांबाबत नाराजी व्यक्त होत आहे.