वाईत २१ ते २५ मे असा पाच दिवस " लघु कुंभ मेळा - २०२६ " आयोजन. पालिका, शक्ती शिवगंगा अटल आश्रम व सेवा समिती यांचा पुढाकार.

वाईत २१ ते २५ मे असा पाच दिवस  " लघु कुंभ मेळा - २०२६ " आयोजन. पालिका, शक्ती शिवगंगा अटल आश्रम व सेवा समिती यांचा पुढाकार.
Published on

वाईत गुरुवारपासून लघुकुंभ मेळा

पालिका, शक्ती शिवगंगा अटल आश्रम व सेवा समिती यांचा पुढाकार

वाई, ता. १७ : प्राचीन काळापासून अनेक ऋषीमुनींची तपोभूमी, ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या या पावन भूमीचे महात्म्य संपूर्ण जगभर पोहोचावे, या हेतूने प्रथमच येथील कृष्णा तीरावर पालिका, लघुकुंभ सेवा समिती, शक्ती शिवगंगा अटल आश्रम यांच्या वतीने भव्य स्वरूपात येत्या २१ ते २५ मेपर्यंत लघुकुंभ मेळा-२०२६ आयोजित करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष अनिल सावंत व मुख्य आयोजक मदन गोसावी महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, ‘‘हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज आणि त्र्यंबकेश्वर या मुख्य कुंभमेळ्यांइतकेच वाईचे धार्मिक महत्त्व आहे. हा केवळ धार्मिक उत्सव नसून तरुण पिढीला भारतीय संस्कृती, परंपरा आणि साधू-संतांच्या विचारांची ओळख करून देण्यासाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महागणपती मंदिराच्या दक्षिण तीरावर गुरुवारी (ता. २१) गुरुपुष्यामृत योग असून, या दिवशी सकाळी ११ वाजता छावणी भूमिपूजन व प्रवेश होणार आहे. शुक्रवारी (ता. २२) सकाळी ११ वाजता धर्मध्वजा आरोहण, शनिवारी (ता. २३) श्री विष्णूयाग व सार्वजनिक हवन, रविवारी (ता. २४) सायंकाळी चार वाजता हिंदू महासभा व दीपप्रज्वलन आणि सोमवारी (ता. २५) नागा संन्याशांचे पावन स्नान, मान्यवर साधू-संत, आचार्य, महामंडलेश्वर व श्रीमहंत यांच्या भव्य रथ शोभायात्रेसह महिला कलश शोभायात्रा पार पडणार आहे. याशिवाय दररोज सायंकाळी ६.३० वाजता ‘श्री कृष्णामाई आरती’आयोजित करण्यात आली आहे. यावेळी देशभरातून येणारे विविध तपस्वी साधू-संत या लघु कुंभमेळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहेत. यामध्ये अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरीजी महाराज, गिरनारचे पीठाधीश्वर तसेच राजस्थान आणि दिल्ली येथील शनी देवस्थानचे पीठाधीश्वर उपस्थित राहणार आहेत. विविध विद्यांचे जाणकार, विद्वान, हठयोगी, खडेश्वरी, ऊर्ध्वबाहू आणि नागा संन्याशांची उपस्थिती या सोहळ्याची शोभा वाढवणार आहे. संपूर्ण परिसरावर २४ तास सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार असून, स्वतंत्र प्रवेश व निर्गमन मार्ग, लाइव्ह अनाउन्समेंट सिस्टीम, आपत्कालीन मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. साधू-संतांसाठी निवास व महाप्रसादाची विशेष सोय करण्यात आली असून, रुग्णवाहिका,अग्निशामक दल आणि वैद्यकीय मदत केंद्रही सज्ज ठेवण्यात आले आहे. जे भाविक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि यूट्युब लाइव्हद्वारे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सर्व समाजबांधव, माता-भगिनी आणि तरुणांनी सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून साधू-संतांचे दर्शन घ्यावे, महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनाचे कल्याण करावे, असे आवाहन नगराध्यक्ष श्री. सावंत यांनी केले.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

PWD's Green Initiative: 28 Trees Replanted Successfully in Wai
Trimbakeshwar Kushavarta water purification project
What is the latest update on Nashik Kumbh Mela 2027 preparations?
Nashik Kumbh Mela 2027 bus transport plan
Marathi News Esakal
www.esakal.com