Leopard Near School : मंचरला प्राथमिक शाळेजवळ आलेले बिबटे मोबाईल मध्ये कैद; शाळेला सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना टळली

Leopard Near School : मंचर येथील लोंढेमळा परिसरात बिबट्याची जोडी उसातून केळीच्या बागेत जाताना नागरिकांनी पाहिली असून, ही घटना जवळच असलेल्या प्राथमिक शाळेपासून अवघ्या ५० मीटरवर घडल्याने सुट्टीमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
Leopard Near School
Leopard Near SchoolSakal
Updated on

मंचर : मंचर शहराच्या कार्यक्षेत्रात असलेल्या लोंढेमळा वस्तीजवळ गुरुवारी (ता१०) सकाळी दहा वाजता बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले. काही नागरिकांनी बिबट्या उसाच्या शेतातून केळीच्या बागेत जात असताना काढलेला व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे येथे असलेल्या प्राथमिक शाळेपासून 50 मीटर अंतरावर बिबट्या ची जोडी होती. पण आज महावीर जयंती ची सुट्टी असल्याने शाळा बंद असल्याने मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com