License Suspended: नगदवाडी-१४ मध्ये संचिता फुड्सवर अन्न व औषध प्रशासनाची धडक; कुल्फी उत्पादन परवाना तात्काळ निलंबित

अन्न सुरक्षा निकषांचे उल्लंघन; कुल्फीबरोबरच फिनेल, फ्लोअर क्लीनरचे उत्पादन एकाच शेडमध्ये सुरू असल्याने संचिता फुड्सचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित
Food and Drug Administration Raid

Food and Drug Administration Raid

Sakal

Updated on

नारायणगाव : अन्नपदार्थांचे उत्पादन करताना अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या मूलभूत निकषांचे पालन न केल्याने अन्न व औषध प्रशासनाने नगदवाडी-१४ नंबर (ता. जुन्नर) येथील संचिता फुड्स या कुल्फी उत्पादनाचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ प्रभावाने निलंबित केले. प्रयोगशाळेच्या विश्लेषण अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.आशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी संतोष सावंत यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com