

Marathi Language Scholar Yasmin Sheikh Dies At 101 Her Books Remain Important References For Marathi Grammar Studies
sakal
पुणे: मराठी भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयांसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या व्रतस्थ ज्ञानसाधक, ज्येष्ठ व्याकरण विदुषी प्रा. यास्मिन शेख (वय १०१) यांचे सोमवारी सकाळी पुण्यात निधन झाले. शेख यांच्या पार्थिवावर बाणेर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.