

पुणे : पती, सासूच्या छळामुळे नवविवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना लोहगाव परिसरात उघडकीस आली. वडिलांना गाडी द्यायला सांग, अशी मागणी पतीने तिच्याकडे केली, तसेच सासूने ‘तू पांढऱ्या पायाची आहे’, असे टोमणे मारल्याची फिर्याद नवविवाहितेने विमानतळ पोलिस ठाण्यात दिली आहे.