

State-Level Satyashodhak Conference Concludes at Otur
esakal
ओतूर : ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही हे आपले दोन प्रमुख शत्रू असून त्यांच्यावर मात करण्याचा लढा हजारो वर्षांपासून सुरू आहे.छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच संत कबीर, संत तुकाराम व संत गाडगेबाबा यांसारख्या महापुरुषांनी समाजाच्या डोक्यातील अंधश्रद्धा व कचरा काढण्याचा प्रयत्न केला; मात्र आजही समाजात ढोंगीपणा व दुटप्पीपणा दिसून येतो असे प्रतिपादन मा.न्यायमूर्ती बी.जी .कोळसे पाटील यांनी केले.
ते ओतूर ता.जुन्नर येथे सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील प्रतिष्ठान आयोजित महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त दोन दिवसीय राज्यव्यापी सत्यशोधक अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी रविवारी ता.२२ रोजी बोलत होते.