Rickshaw Close Agitation : बाईक टॅक्सी सेवा बंद करण्‍याच्‍या मागणीसाठी निदर्शने; सकाळपासून रिक्षा बंद असल्‍याने नागरिकांचे हाल

राज्‍य शासनाने दुचाकीवरून प्रवासी सेवा (बाईक टॅक्सी) ला परवानगी दिल्‍याच्‍या विरोधात पुण्‍यातील रिक्षा पंचायत व विविध रिक्षाचालकांच्‍या संघटनांनी निदर्शने केली.
Rickshaw Close Agitation in pune

Rickshaw Close Agitation in pune

sakal

Updated on: 

पुणे - राज्‍य शासनाने दुचाकीवरून प्रवासी सेवा (बाईक टॅक्सी) ला परवानगी दिल्‍याच्‍या विरोधात पुण्‍यातील रिक्षा पंचायत व विविध रिक्षाचालकांच्‍या संघटनांनी सोमवारी सकाळी परिवहन राज्‍यमंत्री माधुरी मिसाळ यांच्‍या बिबवेवाडी येथील कार्यालयासमोर निदर्शने केली. रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष नितीन पवार यांच्‍या नेतृत्‍वाखाली झालेल्‍या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला. दरम्‍यान, या आंदोलनात बहुतांश रिक्षाचालकांनी सहभाग घेतल्‍याने सोमवारी सकाळपासून प्रवाशांना रिक्षा न मिळाल्‍याने त्‍यांना वाट पाहावी लागल्‍याचे चित्र दिसून आले.

Loading content, please wait...