पुणे-अहमदनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद; रस्त्यावर शुकशुकाट!

Pune_Nagar_Highway
Pune_Nagar_Highway
Updated on

तळेगाव ढमढेरे (पुणे) : विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता.३१) सायंकाळपासून पुणे-अहमदनगर हा रहदारीचा रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारपासूनच पोलिस यंत्रणेने रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरिकेट्स उभे करून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे.

तसेच तळेगाव-ढमढेरे येथेही विविध रस्त्यावर खबरदारी म्हणून पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेट्स लावली आहेत. शिक्रापूर, तळेगाव-ढमढेरे आणि पुणे-नगर रस्त्यावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. गुरुवारी पाच वाजल्यापासून वाहतूक पूर्ण बंद केल्याने रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. नागरिकांनी कायदा आणि सुव्यव्यवस्थेचे पालन करून, परिसरात शांतता राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com