राज्याच्या तिजोरीत पडली कोटींची भर; महसूलमध्ये नोंदवला नवा विक्रम!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

बांधकाम क्षेत्राला चालना तसेच घरखरेदीदारांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 1 सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्कात सवलत दिली आहे.

पुणे : दस्त नोंदणीवर मुद्रांक शुल्कात तीन सवलतीचा गुरवार शेवटचा दिवस असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची गर्दी झाली होती. नोंदणीसाठी झालेली गर्दी विचारात घेऊन दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली. राज्यभरात गुरुवारी (ता.31) दिवसभरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत 16 हजार 481 इतके दस्त नोंदविण्यात आले. त्यातून राज्य शासनाला 118 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. नोंदणी खात्यामध्ये हा नवा विक्रम नोंदविला गेला आहे. 

बांधकाम क्षेत्राला चालना तसेच घरखरेदीदारांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 1 सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्कात सवलत दिली आहे. या कालावधीत दस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होऊ नये, तसेच अधिकाधिक नागरिकांना दस्त नोंदविता यावी, यासाठी डिसेंबर महिन्यात शनिवारीसुध्दा दुय्यम निबंधक कार्यालये सुरु ठेवण्यात आली होती. 

Welcome 2021 : न्यूझीलंडमध्ये झालं नव्या वर्षाचं भन्नाट स्वागत; पाहा व्हिडिओ!

शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीसाठी आठवडाभर नागरिकांची गर्दी होती. आज तीन टक्के सवलतीचा शेवटचा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरीकांच्या रांगा लागल्या होत्या. 28 डिसेंबर रोजी राज्यात दिवसभरात 18 हजार 698 दस्त नोंदविले गेले त्यामधून राज्य शासनाला 131 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. तर दि.29 डिसेंबर रोजी राज्यात 20 हजार 878 दस्त नोंदविण्यात आले आणि राज्य शासनाला 186 कोटी रुपयांचा महसुल मिळाला. तर दि.30 डिसेंबर रोजी राज्यात 20 हजार 618 दस्त नोंदविण्यात आले त्यामधून 169 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. 

CBSE Exam 2021: 10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; वाचा सविस्तर

नववर्षापासून दोन टक्केच सवलत 
मुद्रांक शुल्कात तीन टक्‍क्‍यांची सवलत ही 31 डिसेंबरपर्यंत राज्य सरकारकडून देण्यात आली होती. उद्या म्हणजे 1 जानेवारी ते मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्कात आता 2 टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे शहरात तसेच प्रभाव क्षेत्रांतील गावांमध्ये तीन टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्का सेस (LBT) असा चार टक्केच मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. तर ग्रामीण भागात दोन टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्का सेस असे तीन टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more than Rs 118 crore Revenue collected on 31st December 2020

Tags
टॉपिकस
Topic Tags: