

Pune Crime: Employee Flees with Bag Containing ₹28 Lakh; Pune Police Chase Accused Across 10,000 Km, Arrest Four
esakal
Pune Crime News: पुण्यात एका कुरिअर कंपनीतील कर्मचाऱ्यानेच विश्वासाला तडा देत लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना घडली. मुंबईतील कार्यालयात पोहोचवण्यासाठी दिलेली 28 लाख रुपये आणि सोने-चांदीच्या दागिन्यांची बॅग घेऊन अवघ्या 20 वर्षांचा कर्मचारी पसार झाला. मात्र, पुणे पोलिसांनी हार न मानता तब्बल 25 दिवस त्याचा माग काढला आणि अखेर या प्रकरणातील चार आरोपींना बेड्या ठोकल्या.