

Mula Mutha Riverfront Project In Pune Faces Access Road Issue PMC Plans Acquisition Of Private Land For Development
sakal
पुणे : शेकडो कोटी रुपये खर्च करून मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प पूर्ण करण्यात आला. मात्र, या नदीकाठी जाण्यासाठी नागरिकांना रस्ताच नसल्याने त्याचा वापर करता येत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने संगमवाडी ते बंडगार्डन पुलादरम्यान प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी ३८ हजार ५४२ चौरस मीटर खासगी जागा भूसंपादन करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला आहे.