

DIAT Scientists Achieve Breakthrough in Oil Spill Cleanup Using Microalgae
esakal
-प्रज्वल रामटेके
पुणे: औद्योगिक अपघात, तेलवाहू जहाजांमधील दुर्घटना आणि जागतिक संघर्षांमुळे ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे पाण्यातील तेलगळती ही एक गंभीर पर्यावरणीय समस्या बनली आहे. नद्या, तलाव आणि सागरी जैवविविधतेला असलेला हा धोका रोखण्यासाठी पुण्यातील ‘संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थे’च्या (डीआयएटी) संशोधकांनी सूक्ष्म शैवालांच्या (मायक्रोअल्गी) साहाय्याने तेलाने प्रदूषित झालेले पाणी स्वच्छ करण्याचे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित केले आहे.