BJP Spy Camera Allegation : पुण्यात शिक्षक-पदवीधरच्या मतदानात भाजपकडून स्पायकॅमचा आरोप, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; सुप्रिया सुळेंच्या आरोपाने खळबळ

Pune Graduate Constituency Election : पुण्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या मतदानादरम्यान स्पायकॅमवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपवरील आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले, तर सुप्रिया सुळे यांच्या आरोपांनी राजकीय चर्चेला उधाण आले.
BJP Spy Camera Allegation Pune Graduate Constituency Election devendra fadanvis supriya sule

BJP Spy Camera Allegation Pune Graduate Constituency Election devendra fadanvis supriya sule

esakal

Updated on: 

Pune Teachers Election : पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत स्पाय कॅमेऱ्याचा वापर करून मतदानाचे चित्रीकरण केले जात असल्याच्या आरोपामुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने मतदानाची नोंद केली जात असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना, संबंधित स्पाय कॅमेऱ्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी आपल्याकडे पाठवावी, त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com