dimbhe dam right canal
sakal
मंचर - हुतात्मा बाबू गेनू सागर धरणातून (डिंभे धरण) उजव्या कालव्यात मंगळवारी (ता. २६) १८० क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. मंचर अवसरी खुर्द येथून पाणी कालव्यातून पुढे गेले आहे. आंबेगाव व शिरूर तालुक्यातील सुमारे ३५ गावे व ५० वाड्या वस्त्यावरील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.