Sharad Pawar
sakal
पुणे: ‘‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थता असून, पुण्यासह मुंबई आणि राज्यातील अन्य ठिकाणी त्याचे पडसाद उमटत आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्यांची राज्य सरकार आणि संबंधित संस्थांनी नोंद घेऊन त्यांच्याशी संवाद साधत मार्ग काढण्याची गरज आहे,’’ असे मत ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले.