

Chhatrapati Shivaji Maharaj History Books to Get a Unified Reference Directory by Maharashtra Granthottejak Sanstha in 2030
sakal
‘पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर विविध अंगाने संशोधन करून लिहिण्यात आलेले अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. मात्र, महाराजांवरील या लिखाणाचा समग्र आढावा, कोणकोणत्या अंगाने लेखन झाल्याची माहिती आणि या संपूर्ण माहितीची एकत्रित सूची आजवर उपलब्ध नाही. ही उणीव दूर करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेने ‘शिवचरित्र संदर्भकोश’ हा प्रकल्प हाती घेतला आहे.