Shri Someshwar Sugar Factory
sakal
वडगाव निंबाळकर - श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या गाळप हंगामासाठी ऊस उत्पादकांना प्रतिटन ३,८०० रुपये अंतिम ऊसदर जाहीर केला होता. त्यानुसार उर्वरित अंतिम बिल प्रतिटन पाचशे रुपये प्रमाणे सभासदांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. तर कामगारांना १५ टक्के आगाऊ बोनस दिवाळी भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी ही माहिती दिली.