Pune : बालेवाडीत पाण्याला दुर्गंधी, नागरिकांना प्यावं लागतंय दूषित पाणी; घाण पाण्यामुळे आरोग्य धोक्यात!

गेल्या महिन्यापासून दूषित पाणी (Polluted Water) येत असून पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
Polluted Water Balewadi
Polluted Water Balewadiesakal
Updated on: 
Summary

या दूषित पाण्यामुळे घरातील लहान मुले, ज्येष्ठांना पोटाचे विकार होत असून वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

बालेवाडी : बालेवाडी गावठाण त्याचबरोबर अष्टविनायक चौक, पाटील वस्ती या परिसरात गेल्या महिन्यापासून दूषित पाणी (Polluted Water) येत असून पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागाने यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत.

बालेवाडी येथील बालेवाडी गावठाण, पाटील वस्ती, अष्टविनायक चौक व याच भागातील परफेक्ट टेन, ओर्वी, मधूबन, गिनी विवियाना, पारितोषिक, मधूबन सोसायटी त्याचबरोबर मुंबई-बंगळूर महामार्गाजवळील सरोवर हॉटेल परिसरात अनेक दिवसांपासून दूषित पाण्याच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. दूषित पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

Polluted Water Balewadi
NEET Exam Scam : 'नीट' घोटाळ्याची सिंधुदुर्गातही पाळेमुळे? 'हा' वादग्रस्त ठरलेला संशयित शिक्षक तब्बल 20 वर्षे होता जिल्ह्यात!

या दूषित पाण्यामुळे घरातील लहान मुले, ज्येष्ठांना पोटाचे विकार होत असून वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक नागरिकांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे तक्रार नोंदविली असून त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. बालेवाडीतील रहिवाशी गणेश बालवडकर म्हणाले, सध्या पावसाळ्याचे दिवस असून डासांमुळे अनेक आजार पसरत आहेत. येथे आता दूषित पाणी पिल्याने लोक आजारी पडत आहेत, तरी त्वरित यावर उपाययोजना कराव्यात.

पाणी सोडण्याच्या व्हॉल्वचा मोडला दांडा

बालेवाडी येथे नियोजनपूर्वक पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने व्हॉल्व बसविले आहेत. त्यापैकी एक व्हॉल्व अष्टविनायक चौक येथे असून या व्हॉल्वच्या बाजूलाच सांडपाणी वाहिनीचे चेंबर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे चेंबर तुंबून सांडपाणी वाहत आहे. त्याच्या जवळ असलेला व्हॉल्व सुरू केला असता, त्याद्वारे हे सांडपाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळले जात आहे. येथे पाणी सोडण्याच्या व्हॉल्वचा दांडा मोडला असून याठिकाणी लाकडी खुटी ठोकून काम चालवले जात आहे. यातून पण हे दूषित पाणी जलवाहिनी मिसळले जाते आहे.

Polluted Water Balewadi
मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर बाणेर, कोरेगाव पार्कमधील अनधिकृत हॉटेल जमीनदोस्त; पुण्यात 19 ठिकाणी कारवाई

याठिकाणी पाणी सोडण्याच्या व्हॉल्वचा दांडा गेल्या दीड वर्षापासून तुटला असून येथे लाकडी खुटी बसवली आहे. काम करण्याची कोणती पद्धत आहे ही प्रशासनाची? यामुळेच अनेक दिवसांपासून आम्हाला दूषित पाणी प्यावे लागत आहे. नागरिकांच्या जीवाशीच खेळ लावला आहे प्रशासनाने!

-हनमंत बालवडकर, बालेवाडी

मागच्या दोन वर्षापूर्वी याच भागात दूषित पाणी येऊन अनेक लोक आजारी पडत होते. वारंवार हा प्रश्न उद्भवतो आहे. तरी ही जलवाहिनी सांडपाण्याच्या चेंबर पासून हलवून दुसरीकडे टाकण्यात यावी.

-संदीप बालवडकर, बालेवाडी

औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाला याबद्दल कल्पना दिली असून येथे सांडपाण्याचे चेंबर तुंबले असून खूप सांडपाणी जमा झाले आहे. हे पाणी काढल्याशिवाय नेमकी वाहिनीची कुठे गळती झाली आहे हे समजणार नाही. त्याचबरोबर तुटलेला व्हॉल्वचा दांडा लगेचच बसविण्यात येईल व हे काम त्वरित करून हा प्रश्न सोडविला जाईल.

-प्रदीप रंगदळे, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Water Crisis May Ease As PMC Plans To Get 5 TMC Water From Mulshi Dam And Starts Feasibility Assessment Report Process
Krishna River Pollution
Waste entering the New Khadakwasla Canal from Pune has raised concerns over water quality and drinking water sources in Uruli Kanchan and nearby villages.
New Harsul Development
Marathi News Esakal
www.esakal.com