

इंदापूर, ता. २३ : इंदापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बस स्थानकावर एसटीत बसण्याच्या जागेवरून दोन गटांत तुंबळ मारामारी झाली. याप्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये सात महिलांचा समावेश आहे.
याबाबत सरकारच्या वतीने पोलिस शिपाई सचिन सोपान बोंबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २२ मे २०२५ रोजी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास अकलूज-पुणे एसटी बस इंदापूर बस स्थानकावर आल्यानंतर बसमध्ये प्रवेश करण्यासह बसण्याच्या जागेच्या वादावरून अजय रमेशचंद्र तिवारी (वय ३१, रा. गोरेगाव वेस्ट, मुंबई), वैभव ललित गोरे (वय २७ वर्षे रा. आरेकालनी गोरेगाव मुंबई), विक्की सुबोध सिंग (वय २२, रा. टाटा जमशेदपूर ता. बदलाशहर, झारखंड), प्रिया दीपक सोळंकी (वय २०, रा. नायगाव मुंबई ईस्ट) रिपल रत्नाकर त्रिपाठी (वय १९, रा. कल्याण ता. कल्याण, जि. ठाणे), प्राजक्ता दीनानाथ कहार (वय २४, रा. वसई ता. जि. पालघर), पिंकी प्रेम सिंग (वय १९, रा. विरार, ता.जि. पालघर), जोहा समीर शेख (वय १९, रा. कल्याण, ता. कल्याण, जि. ठाणे), कशीश प्रकाश महाजन (वय २०, रा. कल्याण, ता. कल्याण जि. ठाणे), आकाश हनुमंत शिंदे (वय २५, रा. बिजवडी, ता. इंदापूर जि. पुणे) आणि आरती आकाश शिंदे (वय २२, रा. बिजवडी, ता. इंदापूर जि. पुणे) यांनी सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या समोर आपापसांत एकमेकांचे अंगावर जाऊन मारामारी करीत सार्वजनिक शांतता बिघडवली. यावरून वरील सर्वांविरोधात इंदापूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भोसले करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.