लोणीत अवैध दारू धंद्यावर कारवाई

लोणीत अवैध दारू धंद्यावर कारवाई
Published on

लोणी काळभोर, ता.५ : येथील भरवस्तीत सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू धंद्यावर पोलिसांनी गुरुवारी (ता. ४) छापा टाकला व सुमारे दोन लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मुबारक गड्डे, बानो गड्डे आणि समीर राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे व उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के यांचे पथक गस्तीवर असताना, सकाळी सव्वा नऊच्या सुमारास पाषाणकर बाग परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये मुबारक व बानो गड्डे हे पती-पत्नी हातभट्टीची दारू कॅनमध्ये भरताना आढळले. ही दारू विक्रीसाठी मोटार आणि दुचाकीवर ठेवली होती.
पोलिसांनी घटनास्थळावरून ४५० लिटर दारू, मोटार आणि दोन दुचाकी असा एकूण दोन लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही दारू समीर राठोड याच्याकडून घेतल्याचे तपासात समोर आल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई उपायुक्त राजकुमार शिंदे, सहाय्यक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com