आयटीतील तरुणीचा कोयत्याने वार करून खून सहकाऱ्याकडूनच हत्याराने वार

आयटीतील तरुणीचा कोयत्याने वार करून खून
सहकाऱ्याकडूनच हत्याराने वार
Published on

पुणे, ता. ७ : एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील तरुणीवर तिच्याच सहकाऱ्याने कोयत्याने वार करून खून केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी येरवडा परिसरात घडली. आयटी कंपनीच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
शुभदा शंकर कोदारे (वय २८, रा. बालाजीनगर, कात्रज) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय ३०, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर, पुणे) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी मूळची कराड येथील आहे. ती येरवडा परिसरातील रामवाडी येथील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये कामास होती. तिचा याच कंपनीतील सहकारी कृष्णा कनोजा याच्यासमवेत काही कारणावरून वाद झाला होता. ती मंगळवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास कंपनीच्या पार्किंगमध्ये आली होती. त्यावेळी कनोजाने तिला गाठले अन् तिच्या उजव्या हातावर कोयत्याने वार केले. त्यात मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तरुणी गंभीर जखमी झाली. तिला येरवड्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पैशांच्या कारणावरून वाद !
शुभदा आणि कृष्णा हे दोघे कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये अकाउंटंट म्हणून काम करीत होते. त्यांच्यात पैशांच्या कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातूनच त्याने हे कृत्य केल्याची शक्यता आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com