SKR26B02688
साक्री : अत्याचार प्रकरणातील संशयितांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार सोनवणे यांना देताना समाजबांधव.
------------
‘धुळे अत्याचार प्रकरणातील
संशयितयांवर कारवाई करा’
साक्री, ता. १६ : धुळे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून पीडितेला तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र परीट सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली.
यासंदर्भात साक्री तहसील कार्यालयामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, धुळे शहरातील गोळीबार टेकडी परिसरात घडलेली अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक असून, संपूर्ण समाजमन हादरवणारी आहे. अशा अमानुष घटनांमुळे महिला व बालिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून संशयित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. या वेळी माया मोरे, शुभांगी शिंदे, रोहिणी शिंदे, निलेश भामरे, रोशन येशी, सागर मांडोळे, ऋषी मांडोळे, गोकुळ मोरे, भटू चव्हाण, भूषण चव्हाण, सुनील शिंदे, संतोष शिंदे, महेश हरडे आदी उपस्थित होते.