Jejuri Accident : चुकीच्या ओव्हरटेकमुळे दोघांचा बळी; जेजुरीतील माऊलीनगर येथे बसची दुचाकीला धडक, पती-पत्नीचा मृत्यू

जेजुरी-मोरगाव रस्त्यावरील माउलीनगर येथे सोमवारी (ता. २३) भरधाव पुणे-बारामती नॉनस्टॉप इलेक्ट्रिक बसने दुचाकीला समोरून धडक दिली.
reshma and mahendra najhirkar

reshma and mahendra najhirkar

sakal

Updated on: 

जेजुरी - जेजुरी-मोरगाव रस्त्यावरील माउलीनगर येथे सोमवारी (ता. २३) सकाळी पावणेआठच्या सुमारास भरधाव पुणे-बारामती नॉनस्टॉप इलेक्ट्रिक बसने दुचाकीला समोरून धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला. महेंद्र पोपट नाझीरकर (वय ३५) आणि रेश्मा महेंद्र नाझीरकर (वय ३२, दोघेही रा. नाझरे क.प., खैरेवस्ती, ता. पुरंदर) अशी मृतांची नावे आहेत.

Loading content, please wait...