

DSP Large and Mid Cap Fund
esakal
वसंत कुलकर्णी - vasant@vasantkulkarni.com
शेअर बाजारातील सध्याची अनिश्चितता आणि किरकोळ दिलासा देणारी तेजी वगळता गुंतवणूकदारांनी आक्रमक खरेदी करावी, असे चित्र नाही. सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात ‘एसआयपी’द्वारे सक्रिय व्यवस्थापित फंडांमध्ये, निफ्टी लार्ज-मिड कॅप परिघातील एखाद्या फंडात गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदार विचार करू शकतात. लार्ज अँड मिड कॅप फंड निवडण्यामागील कारण म्हणजे हे फंड मिड कॅपइतके अस्थिर नसतात आणि लार्ज कॅपपेक्षा तुलनेने अधिक परतावा देण्याची क्षमता ठेवतात. याच गटातील डीएसपी लार्ज अँड मिड कॅप फंडाचा घेतलेला हा आढावा...