8th Pay Commission: ३० हजारांऐवजी १५ लाख रुपये मिळणार? ८व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, ७३ प्रस्ताव सादर...

8th Pay Commission: Defence Employees Submit 73 Demands : आठव्या वेतन आयोगाकडे संरक्षण कर्मचाऱ्यांच्या संघटनेने ७३ प्रस्ताव सादर केले आहेत. विमा संरक्षण १५ लाख रुपये, ६ टक्के वेतनवाढ आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Defence employees' union BPMS has submitted around 73 proposals to the 8th Pay Commission, demanding higher insurance coverage of Rs 15 lakh, a 6% annual increment and restoration of the Old Pension Scheme

Defence employees' union BPMS has submitted around 73 proposals to the 8th Pay Commission, demanding higher insurance coverage of Rs 15 lakh, a 6% annual increment and restoration of the Old Pension Scheme

esakal

Updated on: 

८व्या वेतन आयोगासमोर संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या संघटनेने पगार, पेन्शन आणि सेवाविषयक सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याची मागणी केली आहे. संरक्षण मंत्रालयाची मान्यता असलेल्या भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने (BPMS) आयोगाकडे सुमारे ७३ प्रस्ताव सादर केले आहेत. यामध्ये किमान मूळ वेतन, फिटमेंट फॅक्टर, वार्षिक वेतनवाढ, महागाई भत्ता, पेन्शन, बोनस, विमा संरक्षण आणि भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर यांसारख्या विषयांचा समावेश आहे. या मागण्यांमधील विमा संरक्षणाची मर्यादा सध्याच्या ३० हजार रुपयांवरून थेट १५ लाख रुपये करण्याचा प्रस्ताव विशेष महत्त्वाचा आहे.

Loading content, please wait...