

Elon Musk and Mukesh Ambani amid the Starlink India approval controversy, satellite internet competition and regulatory clearance debate
esakal
अमेरिकेतील उद्योजक आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांनी भारतात स्टारलिंकची सेवा सुरू करण्यासाठी परवानगी मिळण्यास होत असलेल्या विलंबावरून मुकेश अंबानी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. शुक्रवारी (९ ऑक्टोबर २०२६) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत मस्क यांनी अंबानी यांना ‘प्रिय पंतप्रधान अंबानी’ असे संबोधले. या माध्यमातून त्यांनी उपरोधिक शब्दांत टीका करत स्टारलिंकला भारतीय बाजारपेठेत स्पर्धा करण्याची संधी देण्याची मागणी केली. गेल्या तीन दिवसांपासून मस्क या मुद्द्यावर सातत्याने भूमिका मांडत आहेत.