Gold Price Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! उच्चांकापासून ₹31,000 स्वस्त; दसऱ्याआधी किती रुपयांना विकलं जातंय सोनं?

Gold Gets Cheaper Ahead of Dussehra: सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांत घसरण होत असून, दसऱ्यापूर्वी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट ठरत आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव आणि बाजारातील बदल जाणून घ्या.
Gold Price Today

Gold Prices Fall Sharply! ₹31,000 Below Record High; Check Gold Rate Before Dussehra

eSakal

Updated on: 

Big Drop in Gold Prices! Buyers Get Relief Ahead of Dussehra: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ऑक्टोबर महिना सध्या दिलासादायक ठरत आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या भावात घसरण दिसून येत असून, महिन्याच्या सुरुवातीपासून सोनं 220 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर 6 सप्टेंबरच्या तुलनेत सोन्याच्या भावात तब्बल 5,500 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या पितृपक्ष सुरू असल्याने सराफा बाजारात सोन्याची मागणी कमी झाली आहे. यासोबतच जागतिक पातळीवरील घडामोडींचाही सोन्याच्या भावावर परिणाम होत आहे. आजच्या घसरणीनंतर सोनं किती रुपयांना विकलं जात आहे, जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com