

India's Super-Rich Boom! 576 Taxpayers Reported ₹100 Crore+ Income, Up 300% in 5 Years
eSakal
India rich taxpayers news: देशात 100 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न जाहीर करणाऱ्या करदात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. करनिर्धारण वर्ष 2025-26 मध्ये अशा 576 व्यक्तींनी ITR मध्ये 100 कोटींपेक्षा अधिक एकूण उत्पन्न जाहीर केले आहे. मागील करनिर्धारण वर्षात ही संख्या 415 होती. म्हणजेच एका वर्षात अशा उच्च उत्पन्न असलेल्या करदात्यांच्या संख्येत 161 ने, म्हणजेच सुमारे 39 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
लोकसभेत एका लेखी उत्तरात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत ₹100 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न जाहीर करणाऱ्या करदात्यांची संख्या तब्बल 300 टक्क्यांनी वाढली आहे.