

From Traffic Jam Victim to Successful Entrepreneur: How a Marathi Youth Built a Food Business
eSakal
Success story of Gaurav Londhe: सध्या सोशल मीडियावर उद्योगपती हर्ष गोयंका यांनी अलीकडेच शेअर केलेला एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. याचे कारण आहे एका मराठी तरुणाची बिझनेस आयडिया आणि त्याचा प्रवास. सोशल मीडियावरील या व्हिडिओत ठाण्यातील गौरव लोंढे यांची प्रेरणादायी उद्योजकीय वाटचाल दाखवण्यात आली आहे. एका साध्या नोकरीतून सुरुवात करत त्यांनी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या ओळखली आणि त्यातूनच स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा केला.