Guru Purnima Significance : अंधारातून प्रकाशात नेणारा...

Teachers and Life Lessons : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयुष्य घडवणाऱ्या शिक्षकांचे स्मरण करत, झाडे, निसर्ग आणि जीवनातील अनुभव हेच मानवजातीचे खरे ‘महागुरू’ असल्याचा विचार मांडणारा लेख.
Guru Purnima Significance

Guru Purnima Significance

esakal

Updated on

प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com

माझ्यामते अखिल मानवजातीसाठी सर्वांत मोठा गुरू कोण असेल, तर ती म्हणजे झाडं. ती गुरूंच्याही पुढची पायरी – ‘महागुरू’ आहेत. रस्ते, इमारती, विकासकामं, मेळे, शेड्स यांसाठी आपण झाडांना कापतो... पण ती कधीच पुन्हा परतवार करत नाहीत. उलट सावली, फुलं-फळं, लाकूड देत राहतात. समस्त पृथ्वीतलावर स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याची सिद्धी आहे ती झाडांकडेच! त्या अन्नावर सर्व प्राणिसृष्टी तगते. उद्या झाडं नसतील तर काय होईल, याची कल्पनाही करवत नाही!

तीन दिवसांनी गुरुपौर्णिमा असल्याने एका तरुणाचा मेसेज आला – गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा!

‘हा काय शुभेच्छा द्यायचा दिवस आहे का?’ असं उत्तर त्याला द्यावं असं वाटत होतं खरं, पण त्याच्या भावना लक्षात घेऊन मी इतकंच लिहून पाठवलं – अत्त दीप भव. तूच तुझा प्रकाश हो. त्याचवेळी नकळत मला शिकवणाऱ्या शाळेतल्या कितीतरी शिक्षकांचे चेहरे आठवले, अगदी पहिला आठवला तो पहिलीतल्या बाईंचा. शाळेत जाण्याच्या पहिल्या काही वर्षांमध्ये रडणं, गोंधळून जाणं अशी फेज सगळ्यांचीच असते. तेव्हा या बाईंनी फार मायेने संभाळून घेतल्याचं आठवलं. मग आठवल्या त्या तिसरीतल्या वर्गशिक्षिका. अ तुकडीतले ‘तथाकथित हुशार विद्यार्थी’ नसूनही फार शांतपणे त्यांनी आम्हाला संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या. शिक्षेपेक्षा ममत्वाची जोड दिली. मग आठवल्या, चवथी-पाचवीत मी ज्यांच्याकडे शिकवणीला जायचो, त्या बाई. त्यांनी गणित इतकं पक्कं करून घेतलं की त्यांची त्रैराशिक पद्धत आजही वेळोवेळी कामाला येते.

आणि एका निर्णायक टप्प्यावर म्हणजे आठवीत असताना जेव्हा मला अचानक भाषा, साहित्य यांची गोडी लागायला सुरुवात झाली तेव्हा हात देणाऱ्या शाळेतल्या मराठीच्या मॅडम आठवल्या. त्याआधी मला मराठी आणि इतर भाषा विषयातले धडे कंटाळवाणे वाटायचे. पण अचानक तीनशेसाठ अंशात गाडी वळावी तसं माझं झालं. कविता आवडू लागल्या, पण हा इतका मोठा बदल स्वीकारायचं कसा हे कळत नव्हतं! त्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता मनात, तेव्हा मॅडमनी मराठी भाषेची गोडी लावली, पाठ्यपुस्तकाबाहेर जात अनेक लेखक-कवींची ओळख करून दिली. त्यांचं मृदू आवाजातलं, त्या कवितेच्या किंवा धड्याच्या खोलात जाऊन शिकवणं मला आजही आठवतं... आणि मराठी माध्यमात शिकल्याने आम्हाला इंग्रजी भाषेची गोडी लावणारे, नुसतं बोलण्याचं इंग्रजी न शिकवता त्या भाषेच्या गाभ्याची ओळख करून देणाऱ्या सर यांना कसं विसरता येईल? त्यांच्यामुळेच मी इंग्रजी पुस्तकं वाचायचा प्रयत्न करू लागलो, तसा आत्मविश्वास मिळाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com