स्वातंत्र्यसेनानी हौसाक्का पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

“स्वातंत्र्यसेनानी आदरणीय हौसाक्का पाटील यांच्या निधनानं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, गोवामुक्ती संग्रामात, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अतुलनीय साहस दाखवणारा महान क्रांतीवीर हरपला आहे.
Hausakka Patil
Hausakka PatilSakal
Updated on

कऱ्हाड - “स्वातंत्र्यसेनानी आदरणीय हौसाक्का पाटील यांच्या निधनानं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, गोवामुक्ती संग्रामात, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अतुलनीय साहस दाखवणारा महान क्रांतीवीर हरपला आहे. महाराष्ट्राच्या स्त्रीशक्तीचं क्षात्रतेज काळाच्या पडद्याआड गेलं आहे. वडील क्रांतिसिंह नाना पाटील यांचा कौटुंबिक, वैचारिक, राष्ट्रभक्तीचा वारसा समर्थपणे पुढे नेतांना महाराष्ट्राच्या पुरोगामी, सुधारणावादी, समतेच्या चळवळीला त्यांनी बळ दिलं.

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्त्रोत, मार्गदर्शकाची भूमिका बजावली.

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातही आधुनिक राष्ट्रनिर्मितीत त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांचं निधन हा महाराष्ट्राच्या कृतीशील वैचारिक चळवळीला मोठा धक्का आहे. आदरणीय हौसाक्का पाटील यांच्या कार्याचा, विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वातंत्र्यसेनानी हौसाक्का पाटील यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com