Chhatrapati Shivaji Maharaj History
esakal
-अमर वांगडे
परळी (जि. सातारा) : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी उभारलेल्या बलशाली आरमाराचा इतिहास नव्या पिढीला समजावा, या उद्देशाने अंबवडे बुद्रुक येथे शिवकालीन जहाजांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले (Shivaji Maharaj naval power and warships) आहे. खटाव येथील कुमार गुरव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नऊ जहाजांच्या प्रतिकृती हे या प्रदर्शनाचे आकर्षण ठरत असून, या माध्यमातून मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.