घाबरु नका! कुडाळ पाठाेपाठ कटगुणच्या मृत कोंबड्यांचाही आला अहवाल

घाबरु नका! कुडाळ पाठाेपाठ कटगुणच्या मृत कोंबड्यांचाही आला अहवाल
Updated on

पुसेगाव (जि. सातारा) : कटगुण (ता. खटाव) येथील आकस्मित मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लू अहवाल निगेटिव्ह असल्याचे भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेद्वारे प्रसिध्द करण्यात आले आहे. कटगुण येथील अमर गोरे यांच्या सुमारे 459 देशी कोंबड्यांचा शनिवारी (ता.23) आकस्मिक मृत्यू झाला होता. अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.
 
पशुवैद्यकीय पथकाने जलद गतीने कटगुण येथे जावून या घटनेची माहिती घेऊन या मृत झालेल्या कोंबड्यांचा नमुना राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेकडे पाठवला होता. कटगुण येथील अमर गोरे यांची खटाव रस्त्यालगत देशी कोंबड्यांची पोल्ट्री आहे. ही पोल्ट्री त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली होती. हा पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचा त्यांचा मनोदय होता. पण, अचानक कोंबड्या मृत झाल्याने अमर गोरे यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे.

पशुवैद्यकीय पथकाने कटगुण येथील या घटनेची प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन माहिती घेतली. या मृत झालेल्या कोंबड्यांचा नमुना पुढील अहवाल प्राप्तीसाठी राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेला पाठवला होता.

आई... ग... उठ ग! उत्कर्ष, शौर्याच्या आक्रोशाने शेळकेवस्तीचे डोळे पाणावले

ग्रामस्थांनो! बर्ड फ्लूची भीती बाळगू नका, काळजी घ्या; जावळीच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दिल्या मार्गदर्शक सूचना

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Girl Dhairya Creates History with Yunam Peak Ascent at Just 14
Hard Work Pays Off as Kival Youth Clear Police Recruitment Exams
Satara’s Daughter Shines at the Border; Amit Shah Appreciates BSF Jawan Asmita Jadhav
Satara:सरकारी योजनेनं घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण वादळानं हिरावलं; शेवटचा हप्ता मिळण्याआधीच अस्मानी संकटात कुटुंब उघड्यावर
Marathi News Esakal
www.esakal.com